about-breadcum
होम > बालसमृद्धी ठेव योजना

बालसमृद्धी ठेव योजना

स्वप्नांवर गुंतवा

बालसमृद्धी ठेव योजना हे मुलांच्या भविष्याला आर्थिक सुरक्षितता देणारे एक प्रभावी साधन आहे. या योजनेत तुम्ही मुलांच्या शिक्षण आणि त्यांच्या भविष्याच्या महत्त्वाच्या खर्चांसाठी निधी जमा करू शकता. आकर्षक व्याजदरामुळे तुमची गुंतवणूक सुरक्षित राहते.

ही योजना मुलांच्या आर्थिक संरक्षणासाठी आदर्श आहे. बालसमृद्धी ठेव योजना तुम्हाला मुलांच्या आर्थिक भविष्याला स्थैर्य देण्याची संधी देते.

बालसमृद्धी ठेव योजना

दरमहा भरायची रक्कम कालावधी कालावधीत जमा होणारी रक्कम कालावधी नंतर मिळणारी रक्कम
600 5 वर्ष 36,000 44,693
1,2000 5 वर्ष 72,000 89,385
2,400 5 वर्ष 1,44,000 1,78,770
3,600 5 वर्ष 2,16,000 2,68,155
4,800 5 वर्ष 2,88,000 3,57,540
6,000 5 वर्ष 3,60,000 4,46,925

अटी व शर्ती

  • बालसमृद्धी ठेव खाते फक्त सभासदत्व असणाऱ्या व्यक्तीच उघडू शकतात.
  • खाते सुरू करण्यासाठी किमान रु. ६००/- दरमहा हप्ता भरणे आवश्यक आहे.
  • मासिक हप्ता नियमितपणे न भरल्यास, ठेवीच्या हप्त्याच्या रकमेवर दररोज १ पैशा प्रमाणे दंड वसूल केला जाईल.
  • मुदतपूर्व ठेवी काढताना, ० ते ६ महिन्यांसाठी कोणतेही व्याज देण्यात येणार नाही. ७ ते ११ महिन्यांसाठी ५% व्याज वार्षिक दराने, तर १२ ते १८ महिन्यांसाठी ७% व्याज वार्षिक दराने, आणि १९ ते २४ महिन्यांसाठी ८% व्याज वार्षिक दराने परतावा केला जाईल.
  • अनियमित भरण्यामुळे व्याजदरात फरक पडू शकतो.