about-breadcum
होम > उरमोडी बालकल्याण ठेव योजना

उरमोडी बालकल्याण ठेव योजना

भविष्य सुरक्षित करा

उरमोडी बालकल्याण ठेव योजना हे आपल्या मुलांच्या भविष्याचे आर्थिक नियोजन करण्यासाठी एक विश्वसनीय आणि सुरक्षित पर्याय आहे. या योजनेत, तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षण, विवाह, तसेच इतर महत्त्वाच्या टप्प्यांसाठी निधी साठवू शकता. या योजनेतून तुम्हाला आकर्षक व्याजदरासह ठेव सुविधा मिळते, ज्यामुळे तुमचे बचतीचे पैसे सुरक्षित आणि वाढीस लागतील.

ही योजना किमान ठेवीपासून ते दीर्घकालीन ठेवीपर्यंत विविध गरजांसाठी उपयुक्त आहे. उरमोडी बालकल्याण ठेव योजना तुमच्या मुलांच्या भविष्याला आर्थिक स्थिरता आणि संरक्षण देण्याचे आश्वासन देते, ज्यामुळे तुम्ही निवांत राहू शकता.

उरमोडी बालकल्याण ठेव योजना

एकदा भरायची रक्कम कालावधी 7 वर्ष
5,000 10,000
10,000 20,000
15,000 30,000
20,000 40,000
25,000 50,000
50,000 1,00,000

अटी व शर्ती

  • सदर ठेवीवर दर सहामाही व्याज आकारणी केली जाईल. सदर व्याज मुद्दलात जमा केली जाईल.
    सदर ठेव योजना ८४ महिन्या करिता कालावधी करिता राहील. तसेच १८ महिन्यापर्यंत रक्कम काढता येणार नाही.
  • उरमोडी बालकल्याण ठेव योजनेमध्ये पाल्याच्या शैक्षणिक फी, व साहित्य ,व विविध बाबीची पूर्तता करण्याकरिता ठेव तारण कर्ज ठेवीच्या व्याजदरापेक्षा ०.५ %ज्यादा व्याज आकारणी केली जाईल.
  • आकस्मिक कारणस्तव १८ महिन्याच्या नंतर ठेव रक्कम काढल्यास ठेवीच्या व्याजदरा मधील २ % कमी व्याजदर आकारणी करून ठेवी वर व्याज दिले जाईल.
  • कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय ठेव योजनेच्या अटी व शर्ती सुधारण्याचा हक्क उरमोडी पतसंस्थेने राखून ठेवले आहेत.